👁 9 Views

पंढरपूर सिंहगडमध्ये रस्ता सुरक्षा अभियान विषयी मार्गदर्शन

Pandharpur LIVE 20 February 2019


    पंढरपूर (प्रतिनिधी) उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर यांच्या कडून ‘सडक सुरक्षा अभियान २०१९’ हा कार्यक्रम कोर्टी (ता. पंढरपूर) येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला   असल्याची माहिती मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डॉ. रविंद्र व्यवहारे यांनी दिली.
  या कार्यक्रमाचे उदघाटन मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डॉ. रविंद्र व्यवहारे, मोटार वाहन निरीक्षक तानाजी धुमाळ,  सहाय्य्क मोटार वाहन निरीक्षक माऊली हजारे, सहाय्य्क मोटार वाहन निरीक्षक उदय साळुंखे आदी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.

📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.https://play.google.com/store/apps/details…➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना धुमाळ म्हणाले, रस्त्यावरून वाहन चालवताना प्रत्येकांनी काळजी घेतली पाहिजे. वाहतुकीचे नियम प्रत्येकांनी पाळले पाहिजेत. अलीकडच्या काळात १८ ते ३५ या वयोगटातील नागरिकांच्या मध्ये अपघातांची संख्या जास्त आहे. वाहन चालवत असताना वाहनाचे स्पीड हे मर्यादित ठेवले पाहिजे. ओहरटेक करीत असताना काळजी घ्या. आपले जीवन सुरक्षित ठेवण्यासाठी हेल्मेटचा वापर नियमित करा. चारचाकी गाडी चालवताना सीट बेल्टचा वापर करावा. वाहन चालवत असताना नशा करू नका, अपघात समयी मदत करा. वाहतुकीचे नियम पाळण्यास स्वत: पासून सुरवात करावी असे उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर येथील धुमाळ यांनी सांगितले.
    यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वाहतुकीचे नियम पाळण्याविषयी शपथ घेतली. उपस्थित विद्यार्थांना स्क्रीन द्वारे अपघात कसे होतात यावर व्हिडीओ दाखविण्यात आले तसेच ३० वे रस्ता सुरक्षा अभियान २०१९ हि माहिती पत्रिका देण्यात आली.  हा कार्यक्रम  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अमित भादुले यांनी केले तर मान्यवरांचे आभार डॉ. रविंद्र व्यवहारे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *