Pandharpur LIVE 21 February 2019
पंढरपूर (प्रतिनिधी) अभियांत्रिकी चे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेतुन स्वतः चे करिअर कौशल्य विकसित करण्यासाठी कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात उद्या शनिवार रोजी राज्यस्तरीय “रेझोनन्स २ के १९” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.https://play.google.com/store/apps/details…➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com
या स्पर्धेत विविध महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी होणार आहेत. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयच्या वतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय “रेझोनन्स २ के १९” मध्ये लेथ वाॅर, कॅड वाॅर, ब्लाईंड ड्राईव्हर, क्विझ, गेम बेटर मध्ये लुड किंग्ज आदी स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेमधुन विद्यार्थ्यांना स्वतः च्या विकासासाठी फायदा व्हावा, त्यांचे कौशल्य वाढावे, स्वतःच्या अंगी असलेल्या कला-गुणांना वाव मिळावा. याच उद्देशाने सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात उद्या शनिवार सकाळी १० वाजता मान्यवरांचे हस्ते राज्यस्तरीय “रेझोनन्स २ के १९” या स्पर्धेचे उदघाटन होणार आहे.
महाविद्यालयाच्या वतीने आयोजित केलेल्या या स्पर्धेत अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या व डिप्लोमा मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार आहे. तरी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डाॅ. रविंद्र व्यवहारे, प्रा. महेंद्र काटकर सह आयोजक प्रा. समिर कटेकर यांनी केले आहे.

