Pandharpur LIVE 25 February 2019
📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.
https://play.google.com/store/apps/details…
➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com
प्राचार्य डॉ. अशोक भोईटे यांनी रयत शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालयामध्ये प्राणीशास्त्र या विषयामध्ये अध्यापन केले आहे. त्यांची २००५ मध्ये प्राचार्य म्हणून नियुक्ती झाल्यापासून आपल्या प्रशासकीय
कामामधून स्वतंत्र असा ठसा उमटविला. रयत शिक्षण संस्थेच्या सचिव पदाच्या तीन वर्षाच्या काळात त्यांनी दिशादर्शक कार्य केले आहे.
मलकापूर, सातारा, कोल्हापूर, पुणे या ठिकाणी प्राचार्य म्हणून कार्य करताना केंद्र शासन, महाराष्ट्र शासन, विद्यापीठ अनुदान आयोग अशा सर्व ठिकाणी त्यांच्या कार्याची नोंद घेतली गेली आहे. शिवाजी विद्यापीठ,
कोल्हापूर येथे प्र. कुलगुरू व कुलगुरू पदावर त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. पंढरपूर येथे जूनमध्ये आल्यापासून त्यांनी अल्पावधीत आपल्या कार्याची ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या कार्याची दखल
घेऊनच त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पंढरपूर महविद्यालयाच्या दृष्टीने ही अभिमानाची गोष्ट आहे. या सन्मानाबद्दल महाविद्यालयाचे कला विभागाचे उपप्राचार्य प्रा. बी. जे. तोडकरी,
वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य प्रा. एन. एन. तंटक, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ. एस. एस. माने, कार्यालयीन प्रमुख अनंता जाधव, शिक्षक- शिक्षेकेतर सेवक, विद्यार्थी आणि पंढरपुरातील रयतप्रेमी नागरिकांनी
अभिनंदन केले.


