👁 9 Views

कै. सागर लोंढे व कै.प्रशांत पाटोळे यांच्या कुटुंबियांना स्वेरीकडून आर्थिक मदत… दोन्ही कुटुंबियांना प्रत्येकी तीन लाख सव्वीस हजार तीनशे तीस रुपयांची मदत

Pandharpur LIVE 26 February 2019

स्वेरीचे शिक्षकेतर कर्मचारी कै. सागर लोंढे व कै. प्रशांत पाटोळे यांच्या अपघाती निधनामुळे त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत दिली. यावेळी धनादेश आणि रोख रक्कम स्विकारताना कुठुंबप्रमुख सौ विजया विलास लोंढे आणि श्री दत्तात्रय माणिक पाटोळे सोबत डावीकडून स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे‘मिशन मोदी अगेन पीएम’चे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष रामगोपाल काका, पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व माजी परिवहन मंत्री सुधाकरपंत परिचारक, विद्या प्रतिष्ठानचे प्रा. राजकुमार कदम सौ. सौ. विजया लोंढे, श्री. दत्तात्रय पाटोळे, नवनाथ पाटोळे (सचिव, वि.वि.कार्य.सोसायटी),  जेष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगे आणि विश्वस्त बी.डी.रोंगे आदी मान्यवर.

पंढरपूर- स्वेरीमधील शिक्षकेतर कर्मचारी सागर शामराव लोंढे व प्रशांत दत्तात्रय पाटोळे यांचे डिसेंबर २०१८ मध्ये मोहोळजवळ अपघाती निधन झाले होते. त्यामुळे स्वेरीचे प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आणि स्वेरी संस्थेकडून असे मिळून दोघांच्या कुटुंबियांना प्रत्येकी तीन लाख सव्वीस हजार तीनशे तीस रुपयांची आर्थिक मदत केली असून ‘शिवजयंती’दिनी प्रमुख पाहुणे विद्या प्रतिष्ठानचे प्रा. राजकुमार कदम, पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व माजी परिवहन मंत्री सुधाकरपंत परिचारक आणि ‘मिशन मोदी अगेन पीएम’चे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष रामगोपाल काका यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये लोंढे व पाटोळे यांच्या कुटुंब प्रमुखांना आदरपूर्वक देण्यात आले.  


📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.

 https://play.google.com/store/apps/details…

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 




गोपाळपूर (ता. पंढरपूर) श्री. विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुटमधील शिक्षकेतर कर्मचारी कै. सागर लोंढे व कै. प्रशांत पाटोळे यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याच्या हेतूने प्राध्यापकवर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सांघिकरीत्या एकूण दोन लाख बावन्न हजार सहाशे साठ रुपये रक्कम जमा केली. तसेच स्वेरी संस्थेने एकूण चार लाख रुपये रक्कम जमा केली. प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून रोख रक्कम आणि स्वेरीकडून मिळालेली चार लाखाची मदत असे मिळून एकूण सहा लाख बावन्न हजार सहाशे साठ रुपये रक्कम जमा झाली ती रक्कम दोघांमध्ये समान विभागून प्रत्तेकी तीन लाख सव्वीस हजार तीनशे तीस रुपये रक्कम कुठुंबप्रमुख सौ. विजया विलास लोंढे आणि श्री दत्तात्रय माणिक पाटोळे यांच्याकडे पाहुण्यांच्या हस्ते सुपूर्द केली. यावेळी संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, जेष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगे, विश्वस्त बी.डी.रोंगे यांच्यासह स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयाचे प्राचार्य, अधिष्ठाता,विभागप्रमुखप्राध्यापकवर्गशिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *