Pandharpur LIVE 28 February 2019
प्रतिकात्मक छायाचित्र
बालाकोटमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या ठिकाणांवर भारताच्या हवाई दलाने कारवाई केल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. पाकिस्तानमध्ये यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दहशतवादी संघटना देखील भारताला धमकी देत आहेत. याच पार्श्वभूमीवर देशभरात हायअलर्ट जारी करण्यात आला. मुंबई देखील हायअलर्टवर आहे. त्यामुळे मुंबई मेट्रोची सुरक्षा देखील वाढवण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव विधिमंडळाचे अधिवेशन आटोपतं घेण्यात आलं आहे. सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणवीस यांनी याची घोषणा केली. गुरुवारी सकाळी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावण्यात आली होती.
📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.
➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com


