Pandharpur LIVE 1 March 2019
करकंब :-
करकंब ता पंढरपूर येथील पोलिस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असलेले मोबाईल शॉपीचे दुकान चोरट्यांनी काल रात्रीच्या सुमारास फोडून करकंब पोलिसांनाच आता चोरट्यांनी खुले आव्हान दिल्याचे दिसते.
करकंब परिसरात सुरु असलेल्या चोरिच्या घटना दिवसेंदिवस वाढत असताना दरोड्या सारख्या घटनाही त्याज्या असताना करकंब पोलिस स्टेशनच्या शेजारीच असलेल्या श्री साई समर्थ मोबाईल शॉपी फोडून चोरट्यांनी पोलिसांनाच खुले आव्हान दिले आहे.
सविस्तर माहिती अशी की, येथील अजित अनिल टेके यांच्या श्री साई समर्थ मोबाईल शॉपिचे दि 1 रोजी (काल) रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी बंद दरवाजाचे कुलूप तोडून एल जी कंपनीचा 18 इंच काळ्या रंगाचा एल ई डी,दोन काळ्या रंगाचे सी पी यु,चार पेंड्रायव्ह,चार्जर,मेमरी कार्ड व इतर साहित्य असा एकूण 24 हजार चारशे रु किमतिचा मुद्देमाल चोरुन नेऊन चोरट्यांनी पोबारा केला आहे.याबाबत पुढील तपास करकंब पोलिस करित आहेत.
📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.
➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com



