👁 3 Views

सोलापूर: अल्पवयीन भाचीवर मामाकडून अत्याचार

 

दक्षिण सोलापुरातील एका पाड्यावरील साडेपंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या मामानेच अत्याचार केल्याची घटना आता समोर आली आहे.


नागपंचमीला मामाच्या गावी गेल्यानंतर लहान मामाने आजी प्रात:विधीसाठी बाहेर गेल्यावर २ ऑगस्ट २०२२ रोजी पहिल्यांदा शारीरिक अत्याचार केला.


त्यानंतर दुसऱ्या दिवशी पण सर्वजण झोपी गेल्यावर अत्याचार केला.

गावी परतल्यावर काही दिवसांनी पोटात दुखू लागल्याने तिच्या आईने पीडितेला शासकीय हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी नेले. त्यावेळी पीडिता साडेपाच महिन्यांची गर्भवती असल्याची बाब समोर आली.


त्यानंतर पीडितेने मामाविरूद्ध विजापूर नाका पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी त्या मामाविरूद्ध गुन्हा दाखल केला असून परराज्यातील संशयित आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *