Pandharpur LIVE 7 March 2019
पंढरपूर (प्रतिनिधी) :- येथील श्री. व सौ. सविता रवि सोनार या दाम्पत्यांची कन्या कु. रेवती रवि सोनार हिला तिच्या वाढदिवसाच्या औचित्याने तिचा भाऊ चि. ओंकार रवि सोनार याच्याकडून भेट म्हणून देण्यात आलेले डेस्क कॅलेंडर हे सर्वात मोठे डेस्क कॅलेंडर असल्याचे ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ च्या वतीने कु. रेवती रवि सोनार हिला प्रमाणित करण्यात आलेले आहे.
सात फूट उंच आणि दहा फूट रुंद या आकारात असलेले एकूण सत्तर चौरस फूट क्षेत्रफळ असलेले हे कॅलेंडर सात पानांचे असून पहिल्या पानावर वर्षभरातील बारा महिन्यांचे दिनांक व वार दिलेले आहेत. तर उर्वरित सहा पानांवर प्रत्येकी दोन महिन्यांचे दिनांक व वार दिलेले आहेत. शिवाय त्या सहा पानांवर कवी रवि सोनार यांचे ‘बहिण’ या विषयावरील सुविचार आहेत.
📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.
➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com



