Pandharpur LIVE 11 March 2019
पंढरपूर:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या भव्य मैदानावर मुलींच्या स्वरक्षणासाठी अत्यंत आवश्यक असणारा विशेष उपक्रम ‘मिशन साहसी’ नुकताच पार पडला.
या कार्यक्रमामध्ये पंढरपूर मधील विविध शाळेतील मुलींनी सक्रिय सहभाग घेतला होता. ‘मिशन साहसी’चा मेगा डेमौनस्ट्रेशन कार्यक्रम पार पडला आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून जवळपास दोन ते अडीच हजार मुलींना प्रशिक्षण घेता आले. या उपक्रमाला मुलींनीही प्रचंड प्रतिसाद दिला.
📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.
➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com
यामध्ये स्वेरीअंतर्गत असणारे चारही महाविद्यालय अर्थात इंजिनिअरिंग, बी. फार्मसी, डिप्लोमा इंजिनिअरिंग, डी. फार्मसी तसेच पंढरपूर शहरातील लोकमान्य विद्यालय,विवेकवर्धीनी विद्यालय, सखूबाई मातोश्री कन्या प्रशाला, आश्रम शाळा वाखरी, यशकिर्ती विद्यालय ह्या शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थीनींनी ‘मिशन साहसी’ या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. या कार्यक्रमासाठी प्रशिक्षक आंतरराष्ट्रीय जुदो खेळाडू भुवनेश्वरी जाधव, सोलापूर जि.प.सदस्य ज्योती पाटील, वैष्णवी महिला उन्नती संस्थेच्या अध्यक्षा राजश्री नागणे-पाटील, संस्थेचे जेष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगे, श्रद्धा पावले आणि मैथिली महाकोडे हे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी विशेष प्रशिक्षक म्हणून एशियन मार्शल आर्ट्सचे चिफ मास्टर सचिन भुईटे, योगेश भोसले,चिफ इंस्ट्रक्टर, राजेश गायकवाड, प्रशिक्षक परवेज शेख, विकास घोडके यांनी विद्यार्थीनींना उपयोगी प्रशिक्षण दिले. अरुणा पुजारी हिने या कार्यक्रमाचे स्वरूप पटवून सांगितले.
या कार्यक्रमासाठी स्वेरीचे सर्व अधिष्ठाता,विभागप्रमुख, विद्यार्थी परिषदेचे सोलापूर सहमंत्री शुभम अग्रवाल, संगमनाथ उप्पिन, जिल्हासंयोजक विशाल भोसले, शहर मंत्री तुकाराम कवठेकर, पूजा रोंगे, प्रणव बाडगंडी, अनुप देवधर, आनंद भुसनर, महाविद्यालयीन अध्यक्ष शुभम बंडगर, गोपाळ सुरवसे, सुरज पावसे, अजय परदेशी, आकाश लोहार, प्रताप नेटके, नितीन टेळे, कृष्णा शेंडगे, मयुर वसव, भूषण बचुटे, सुशांत अलदर, धनराज भोसले, सुयश लुबाल याचे बहुमोल सहकार्य लाभले.

