👁 6 Views

एकाच महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांनी संपविले जीवन…

औरंगाबाद: देवगिरी महाविद्यालयातील एका विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्याने अज्ञात कारणावरून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. दोन्‍ही एकाच महाविद्यालयातील  विद्यार्थी असल्‍याने खळबळ उडाली आहे. 


औरंगाबादमधील सिडको परिसरात राहणारी तेजस्विनी अवकाळे ही तरुणी विद्यालयात बारावीचे शिक्षण घेत होती. 


तर ती राज्यस्तरीय बॉक्सिंग खेळाडू देखील आहे. तेजस्विनीने १२ फेब्रुवारीला राहत्या घरात विषारी द्रव्य प्राशन केले होते. तिची रात्री प्राणज्योत मालवली.


त्याच महाविद्यालयात गारखेडा परिसरातील व्यंकटेश चव्हाण हा विज्ञान शाखेत प्रथम वर्षाचे शिक्षण घेत होता. त्याने मंगळवार (१४ फेब्रुवारी) आपल्या राहत्या घरी साडीच्या सहाय्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी सिडको आणि पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *