Pandharpur LIVE 16 March 2019
हरिदास शिवाजी तनमोर असे मृत इसमाचे नाव आहे. सदर घटनेची नोंद मोहोळ पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर इसम हा दि. १४ मार्च रोजी सकाळी ११:४५ वा. सावळेश्वर येथील हाॅटेलवर थांबला होता. यावेळी त्याने कीटकनाशक प्राशन केले. कीटकनाशक प्राशन केल्याची माहिती त्याने मोबाईलवरून मेसेज करून नातेवाईकांना कळवली होती. नातेवाईकांना ही माहिती समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याला सोलापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले परंतु पहाटे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी डॉ. सारंग भांजे यांनी फिर्याद दिली आहे.
📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.
➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com



