👁 10 Views

पंढरपूर-सांगोला मार्गावरील अपघातात पंढरीतील ५ वर्षाच्या चिमुकल्यासह आईचा मृत्यू… वडील गंभीर जखमी

Pandharpur LIVE 17 March 2019


अपघातात मायलेकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे पंढरीतील फत्तेपूरकर नगरावर शोककळा पसरली आहे.

पंढरपूर (प्रतिनिधी):- येथील फत्तेपुरकर नगरमधील रहिवासी सोपान नारायण निकते यांच्या गाडीचा काल रात्री अपघात झाला. या अपघातात सोपान निकते यांच्या पत्नी अश्लेशा सोपान निकते वय २९ व मुलगा आरव सोपान निकते वय ५ या मायलेकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून सोपान नारायण निकते हे  गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातातील जखमी सोपान निकते
 निकते कुटूंबीय हे आपल्या ईरटीगा गाडी क्र. एम. एच.13 बी. एन. 8518 मध्ये बसून सांगोल्याहून पंढरपूरकडे येत होते.  काल दि. १६ मार्च रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास मेथवडे जवळ चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाली. 

 या भीषण अपघातात गाडीतील सर्वजण जखमी झाले होते. त्यांना पंढरपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचारा दरम्यान सोपान निकते यांच्या पत्नी अश्लेशा सोपान निकते वय २९ व मुलगा आरव सोपान निकते वय ५ यांचा मृत्यू झाला असून सोपान नारायण निकते हे  गंभीर जखमी झाले आहेत.  वाढदिवसासाठी सर्वजण  सासूरवाडीकडे सांगोला येथे गेले होते.

अपघातग्रस्त गाडी
आज सकाळी अपघातातील माय लेकाचा अंत्यसंस्कार भूवैकुंठ स्मशानभूमीत करण्यात आले. या वेळी नातेवाईक, समाज, मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिकते कुटूंबातील दोघा मायलेकाचा अशाप्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे .


📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.
➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *