पंढरपूर- सोलापूर लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ऍड. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनी अर्ज भरला असून 28 मार्च रोजी दुपारी 12 वाजता त्यांची संत तनपुरे महाराज मठ, स्टेशन रोड, पंढरपूर येथे प्रचाराची सभा संपन्न झाली. अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष सुनिल वाघमारे होते.
प्रमुख वक्ते धनगर समाज नेते अण्णाराव पाटील, माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार ऍड. विजय मोरे, लिंगायत समाज नेते शिवानंद हैबतपुरे, अ.भा. माळी महासंघाचे अध्यक्ष शंकरराव लिंगे, सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार व रिपब्लिक होलार परिषदेचे अध्यक्ष एस. के. ऐवळे,विश्व वारकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. अरुणभाऊ बुरघाटे महाराज यांची भाषणे झाली. यावेळी भटके विमुक्त समाज नेते अँड. अरुण जाधव, भारिप जिल्हाध्यक्ष निशांत बनसोडे, माढा विभाग अध्यक्ष दशरथ कांबळे, युवा जिल्हाध्यक्ष सागर गायकवाड, महासचिव रुपेश बनसोडे,भारिपचे तालुकाध्यक्ष ऍड. सुरेश कांबळे, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष मल्हारी बनसोडे, शहराध्यक्ष योगेश मोरे, एमआयएमचे शहराध्यक्ष जुबेर बागवान, भारिपचे शहराध्यक्ष प्रकाश दुपारगुडे, लक्ष्मण गायकवाड, प्रा. धैर्यशील भंडारे उपस्थित होते. प्रास्ताविक व सुत्रसंचालन बी. आर. भोसले यांनी केले. तर आभार शहराध्यक्ष योगेश मोरे यांनी मानले.
📲 पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.https://play.google.com/store/apps/details… ➡️ पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165 कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूर Mail- livepandharpur@gmail.com