👁 10 Views

चंद्रभागेत स्नान करताना भाविक बुडून बेपत्ता… पहाटेपासून शोधकार्य सुरू

Pandharpur LIVE 31 March 2019

चंद्रभागा नदी

आज पहाटे ५ वाजता चंद्रभागेच्या पात्रात स्नानासाठी गेलेला एक भावीक नदीपात्रातील खड्डयात बुडून बेपत्ता झाला आहे. याबाबत पंढरपूर लाईव्ह ला समजलेल्या माहितीनुसार,    गोविंद जनार्धन सुवर्णकार (२७), (रा. देगलुर, ता.जि. नांदेड) हा भावीक  चंद्रभागेत स्नान करत असताना नदीपात्रातील खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे बुडाला. ही घटना आज पहाटे ५ वा. खिस्ते घाटाजवळ घडली. बळीराजा शेतकरी संघटनेचे माऊली हळनवर यांनी याबाबत पंढरपूर लाईव्ह ला अधिक माहिती दिली. बुडालेल्या भाविकांचा शोध कोळी समाजातील तरूण होडीचालकांच्या मदतीने सूरू आहे.
नांदेड जिल्ह्यातील सुवर्णकार कुटूंबीय आज सांगोला येथे नातेवाईकांच्या विवाह सोहळ्यास जाणार होते, पहाटे चंद्रभागेचे स्नान करून विठोबाचे दर्शन घेऊन सांगोल्याला जाण्याचा त्यांचा विचार होता; परंतु आंघोळीसाठी नदीपात्रात गेलेले गोविंद सुवर्णकार  बुडाल्याने या कुटुंबावर आघात झाला असून पोलिसांना याची माहिती दिली आहे.
नदीपात्रात अद्याप शोधकार्य सुरू आहे. नुकतेच उजनीतुन पाणी सोडल्याने चंद्रभागेचे पात्र भरुन वाहत आहे. अवैधरित्या वाळुउपसा करणार्यांनी नदीपात्रात खड्डे पाडल्यामुळे पाण्याखाली गेलेल्या अशा खड्ड्यांचा अंदाज न आल्याने चंद्रभागेत स्नानासाठी गेलेले भाविक बुडण्याचा धोका कायम आहे.

खालील लिंकला क्लीक करा आणि तुमच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा Pandharpur Live  चे अन्ड्रॉईड अ‍ॅप्लीकेशन.  https://play.google.com/store/apps/details 

पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165 

कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूर

Mail- livepandharpur@gmail.com 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *