पंढरीतील डीव्हीपी मल्टीप्लेक्समध्ये कलाकारांची ‘एक झलक’ पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी पंढरपूर- गरुड फिल्म्स ची निर्मिती असणारा ‘धुमस’ हा बहुचर्चित मराठी चित्रपट पंढरीतील डीव्हीपी मल्टीप्लेक्स सिनेमागृहामध्ये प्रदर्शित झाल्यापासुन याचे सर्व शो ‘हाऊसफुल्ल’ सुरु आहेत. नुकतीच या चित्रपटातील सर्व कलाकारांनी व निर्माता दिग्दर्शकांनी डीव्हीपी मल्टीप्लेक्स सिनेमागृहामध्ये प्रेक्षकांमध्ये बसुन हा चित्रपट पाहिला.
को.प्रोड्युसर डी. गोवर्धन, डायरेक्टर शिवाजी दोलताडे व कलाकार रोहन पाटील, कृतिका गायकवाड, साक्षी चौधरी, पंढरपूर चे प्रा.सुभाष मस्के या सर्वांनी आपल्या चित्रपटाला मिळणारा प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद प्रत्यक्ष अनुभवला.
राज्यातील तब्बल 400 चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित झाला असुन सिनेरसिकांमधुन चित्रपटास भरघोष प्रतिसाद मिळत आहे.
——————————————————-
पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल ” पंढरपूर Live ”
तब्बल 39 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या पंढरपूर Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, जि. सोलापूर 413304