पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार
तानाजी हळवर आणी घोडके (सोलापुर) यांच्यातील जमिनीच्या वादातून, जुने घर सोडावे म्हणुन वाद झाल्याची माहिती मिळत आहे. इतरांना कायम सहकार्य करण्याची भूमिका चोखपणे बजावणारे माऊली हळनवर यांच्यावर झालेल्या या भ्याड हल्ल्याचा सर्वत्र निषेध व्यक्त होत आहे.
चार ते पाच जणांच्या टोळीने घरात घुसून हळवणर यांच्यावर हल्ला केला. धारदार शस्त्राने वार केल्यामुळे माऊली आणि तानाजी हळवणर यांना गंभीर दुखापत झाली आहे
महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येलाच पंढरपूरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वंचित बहुजन विकास आघाडीचे जिल्हा संघटक माऊली हळणवर आणि तानाजी हळवणर या दोघांवर धारदार शस्त्राने वार केले आहेत. या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पंढरपूरच्या ईश्वर वठार परिसरात हळवणर यांचं घर आहे. चार ते पाच जणांच्या टोळीने घरात घुसून हळवणर यांच्यावर हल्ला केला. धारदार शस्त्राने वार केल्यामुळे माऊली आणि तानाजी हळवणर यांना गंभीर दुखापत झाली आहे.
अवैध सावकारकीच्या व्यवहारातून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती मिडीयाला मिळाली होती परंतु हा हल्ला घरजागेच्या वादातून झाल्याची माहिती आता समोर येत आहे.
घटना घडताच माऊली आणि तानाजी यांना तात्काळ पंढरपूरच्या लाईफलाईन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

——————————————————-
पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल ” पंढरपूर Live ”
तब्बल 40 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या
पंढरपूर Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर,
जि. सोलापूर 413304
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whats Up – 8308838111, 7083980165
Mobile- 8149624977
Mail- livepandharpur@gmail.com