‘अॅप’डेट : आता अॅप सांगणार, तुमच्या मुलाच्या रडण्याचं कारण!

Loading

'अॅप'डेट : आता अॅप सांगणार, तुमच्या मुलाच्या रडण्याचं कारण!मुंबई अनेकदा लहान मुलांच्या रडण्याचं कारणच कळत नाही. त्यामुळे आई-वडील मुलांच्या रडण्याचं काय कारण असाव, याचा विचार करत बसतात. मात्र, एका संशोधक गटानं याचा शोध घेऊन त्यावर उपाय शोधला आहे.
नॅशनल तैवान यूनिव्हर्सिटी हॉस्पिटल यूनलिनने एक अॅप तयार केलं आहे, जे लहान मुलांचा आवाज ऐकून त्यामागचं कारण सांगू शकेल. ‘The Infant Cries Translator’ असं या अॅपचं नाव आहे. संशोधक गटाचा दावा आहे की, लहान मुलांच्या रडण्याच्या आवाजावरुन त्यामगाची कारणं समजू शकतील.
इंग्रजी वृत्तपत्र ‘डेली मेल’च्या वृत्तानुसार, एका संशोधकाने हे अॅप लहान मुलांच्या रडणं ट्रान्सलेट करुन वेगवेगळ्या आवाजावरुन ही कारणं सापडतात.
जेव्हा तुमचं मुल रडायला सुरु करतं, त्यावेळी या अॅपमधील रेकॉर्डिंग बटन 10 सेकंदांपर्यंत पुश करावं लागेल. त्यानंतर मुलाच्या रडण्याचा आवाज आपोआप अॅपमधील क्लाऊड ड्राईव्हमध्ये अपलोड होईल. त्यानंतर जवळपास 10 सेकंदांनंतर मुल का रडत होतं, याचं कारण मिळेल.
हे अॅप बनवण्यासाठी एका टीमने 100 नवजात बालकांच्या रडण्याचे 2 लाख रेकॉर्डिंग्स जमा केल्या. संशोधकांचे म्हणणे आहे की, 6 महिन्यांहून कमी वयाच्या चिमुरड्यांसाठी हे अॅप अत्यंत उपयोगाचं आहे. हे अॅप गूगल प्ले स्टोअर आणि अॅपल प्ले स्टोअरमधून डाऊनलोड करता येणार आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *