Solapur Loksabha Election : शेतकरी,सुशिक्षित बेरोजगार,महिला व सर्वसामान्याच्या मुळावर उठलेल्या मोदी सरकारच्या थापांना व गॅरंटीला भुलायचे नाही, भागाईवाडीतील नागरिकांचा निर्धार

Loading

Pandharpur Live: अच्छे दिन आनेवाले है सांगत मोदींनी 2014 ला सत्ता मिळवली,प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख देणार सांगत 2019 ला परत सत्ता मिळवली तर आता ही तर मोदींची गँरटी म्हणत फिर एक बार मोदी सरकार सांगत मते मागत असले तरी आता अश्या भूलथापांना भुलायचे नाही,शेतकरी,सुशिक्षित बेरोजगार,महिलां व सर्वसामान्याच्या मुळावर उठलेले मोदी सरकार विरोधात जनता पेटून उठली असुन अबकी बार भाजपा हद्दपार हा संकल्प घेऊन मतदारांनी ही निवडणुक हातात घेतली असल्याने यावेळी  राज्यात महाविकास आघाडीचे सर्वाधिक उमेदवार विजयी होणार तर प्रणितीताई शिंदे यांच्यासाठी अब दिल्ली दुर नही हे मतदाराच्या प्रतिसादावरून दिसुन येत असल्याचे जेष्ठ नागरीक लहु घोडके यांनी सांगितले.

सोलापूर लोकसभा मतदार संघातील लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार

यांच्या प्रचारार्थ भागाईवाडी येथे नागरीकांची बैठक झाली,बैठकीस गावातील नागरिक,महिला,युवावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.महागाई प्रंचड वाढली आहे,प्रत्येक वस्तुवर जीएसटी जिवघेणी ठरली आहे.खते,बि-बियाणेच्या किंमती वारेमाप वाढल्या,पण शेतीमालास भाव नाही,भाजपाने शेतक-याला उध्दस्त  केले आहे अश्या सरकारला जनता वैतागली असुन यावेळी मोदी शासन तडीपार करा असे आवहान केले. यावेळी भागाईवाडी येथे सर्व नागरीक,महिला 

व युवावर्गाची एकत्रीत बैठक घेऊन

महाविकास आघाडीच्या उमेदवार

प्रणितीताई शिंदे यांना गावातुन सर्वाधिक 

मताधिक्य देण्याचे आवहान 

सरपंच परिषदेच्या महिला जिल्हाध्यक्ष

सौ.कविता घोडके पाटील व जेष्ठ नागरिक लहु घोडके यांनी केले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *