मंगळवेढा : भोसे ते शिरनांदगी हा सहा किलोमीटर लांबीचा भोसे तलाव परिसरातील रस्ता मुळातच अरूंद असताना हा रस्ता खड्डे व चिलारीच्या झाडांनी वेढल्याने अपघाताला निमंत्रण देत आहे. यामुळे वाहनचालक व भोसे-शिरनांदगी परिसरातील ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
भोसे-शिरनांदगी या भोसे तलावातून जाणार्या रस्त्यावरून दररोज शालेय विद्यार्थी, दूध वाहतूक करणारी वाहने मोठय़ा प्रमाणात जातात. भोसे हे बाजारपेठेचे केंद्र असल्याने वाहनांची नेहमीच या रस्त्यावरून मोठय़ा प्रमाणात वर्दळअसते. मुळात हा रस्ता अरूंद असून जागोजागी मोठमोठे खड्डेच खड्डे पडले असून रस्त्याच्या दोन्ही बाजूला काटेरी झुडपांनी वेढा दिला आहे. यामुळे या परिसरातील नागरिकांना अपघाताचा सामना करावा लागत आहे. यामुळे हा रस्ता दुरूस्त करून काटेरी झुडपे काढण्याची मागणी होत आहे