‘कर्मयोगी’मध्ये क्रीडा सप्ताहाचे उद््घाटन

Loading

कर्मयोगी अभियांत्रिकी महाविद्यालयात क्रीडा स्पर्धेचे उद््घाटन करताना प्रा. विजयकुमार कुलकर्णी, रजिस्ट्रार गणेश वाळके, प्रा. जे. एल. मुढेगावकर, क्रीडा संचालक प्रा. सुभाष मस्के व विद्यापीठ विद्यार्थी प्रतिनिधी वैजिनाथ पवार आदी. उपरी : शेळवे (ता. पंढरपूर)येथील कर्मयोगी अभियांत्रिकी महाविद्यालयात रण २0१६ या क्रीडा सप्ताहाचे उद््घाटन कर्मयोगी पब्लिक स्कूलचे प्राचार्य विजयकुमार कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. पी. पाटील होते.
यावेळी प्राचार्य ए. बी. कणसे, रजिस्ट्रार गणेशवाळके, विभागप्रमुख प्रा. आर. जे. पांचाळ, प्रा. जे. एल. मुढेगावकर, प्रा. ए. टी. बाबर, प्रा. वाय. एस. लोणकर, प्रा. एन. जी. तिवारी, क्रीडा संचालक प्रा. सुभाष मस्के, विद्यापीठ विद्यार्थी प्रतिनिधी वैजिनाथ पवार आदी उपस्थित होते. यावेळी खो-खो, कबड्डी, व्हॉलिबॉल, फुटबॉल, टेबल टेनिस, बॅडमिंटन, क्रिकेट, अँथलेटिक्स या स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेचा प्रारंभ व्हॉलिबॉल स्पर्धेने झाला. या स्पर्धेसाठी ३00 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
प्रास्ताविक क्रीडा संचालक प्रा. एस. पी. मस्के यांनी केले. प्रा. जे. एल. मुढेगावकर यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी प्रा. एस. जे. सावेकर, यु. आर. कार्वेकर, प्रा. व्ही. एल. जगताप, प्रा. एस. एस. जगताप, प्रा. डी. व्ही. भोसले, प्रा. एल. जे. कोरे, प्रा. एस. एम. शिंदे, प्रा. टी. टी. मुलाणी, प्रा. जी. एस. पापंटवार परिश्रम घेत आहेत. 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *