पंढरपूर : आजची तरूण पिढी फ्रेश वाटते व आनंद वाटतो म्हणून तंबाखू, पानमसाला यासारख्या तंबाखूजन्य व्यसनाच्या विळख्यात अडकली आहे. व्यसनामुळे तरूण पिढीचे आरोग्य धोक्यात आले आहे. येणारी तरूणपिढी आरोग्य संपन्न होण्यासाठी पालकांनी व्यसनाचे दुष्परिणाम मुलांना सांगून प्रबोधन करावे. लहान मुले मोठय़ांचे अनुकरणकरतात, यामुळे पालकांचे वर्तन त्यांना पोषक असावे, घरात खेळीमेळीचे वातावरणठेवून त्यांना वेळ द्यावा, पालकांनी व्यसनापासून दूर राहून मुलांबरोबर मोकळेपणाने जीवन जगले पाहिजे, असे प्रतिपादन संख्याशास्त्र विभागाचे प्रा. अवी कोपार्डे यांनी केले.
येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात प्राध्यापक प्रबोधिनीच्या वतीने व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी ते पंढरपुरातील तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन :संख्यात्मक विश्लेषण’या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. जे. जी. जाधव होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. अशोक उपासे, उपप्राचार्य के. एन. बागल, प्राध्यापक प्रबोधिनीचे अध्यक्ष डॉ. चांगदेव कांबळे उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. अमर कांबळे यांनी केले. डॉ. एम. के. पांचाळयांनी आभार मानले.