सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंड म्हणून चर्चेत असलेल्या बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि ऐश्वर्या राय-बच्चन पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. त्यांच्याबरोबर सोनम कपूरही पहायला मिळणार आहे.
मुंबई- सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंड म्हणून चर्चेत असलेल्या बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि ऐश्वर्या राय-बच्चन पहिल्यांदाच एकत्र काम करणार असून त्यांच्याबरोबर सोनम कपूरही पहायला मिळणार आहे.
या तिन्ही अभिनेत्री हेअर प्रॉडक्टच्या जाहिरातीत एकत्र दिसणार आहेत. ‘लॉरियल पॅरिस’च्या या तिघीही ब्रँड अॅम्बेसेडर आहेत. सोनम आणि कतरिना या दोघीही ऐश्वर्यासोबत काम केल्याने आनंदी आहेत.
सोनम कपूरने ट्विटरच्या माध्यमातून या बातमीला दुजोरा दिला आहे. आम्ही तिघीही जाहिरातीच्या निमित्ताने एकत्र आल्याने खूप आनंदी असल्याचे सोनमने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. बॉलिवूडमध्ये वेगळी ओळख असलेल्या तिन्ही अभिनेत्री एकत्रितपणे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.