मकरसंक्रांतीनिमित्त श्रीरुक्मिणी मातेस पहाटे 4:30 ते 5:30 या वेळेतच भोगी करावी…. 14 फेब्रुवारी रोजी महिला भगिणींच्या सोयीसाठी पुरुष भाविकांनी मुख दर्शन घ्यावे…. वि.रु. मंदिर समितीची माहिती….
पंढरपूर लाईव्ह वृत्त:- दि.11 जानेवारी 2016 मकरसंक्रांतीनिमित्त ज्या महिला भाविकांना श्रीरुक्मिणी मातेस भोगी करावयाची आहे अशा महिला भगिणींनी दि. 14 जानेवारी रोजी पहाटे 4:30 ते 5:30 यावेळेत करावी. तसेच पुरुष भाविकांनी या दिवशी महिलांच्या सोयीसाठी म्हणून श्री चे दर्शन घेताना मुखदर्शन घ्यावे. अशी माहिती विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर यांचे वतीने देण्यात आली आहे.