सभासदांचा वाढता पाठिंबा मिळत असल्याने विरोधकांचे पॅनल लुळे पडले!- कल्याणराव काळे

Loading

 

 पुळूज, ता.पंढरपूर श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचार सभेत बोलतांना  सह.शि.वसंतराव काळे कारखान्याचे कल्याणराव काळे याप्रसंगी, आमदार श्री भारत भालके, संचालक सर्वश्री मोहनआण्णा कोळेकर, राजुबापू पाटील तसेच श्री विठ्ठल सूतगिरणीचे चेअरमन दिनकर पाटील व कारखान्याचे माजी संचालक                            श्री ज्ञानेश्‍वर गायकवाड, भिमा कारखान्याचे व्हा.चेअरमन श्री सतीश जगताप आदी.
पंढरपूर (दि.11) ः आमदार श्री भारत भालके यांच्या नेतृतवाखालील श्री विठ्ठल शेतकरी विकास पॅनलला सभासदांचा मोठा पाठिंबा मिळत असल्याने विरोधी बी.पी.रोंगे यांचे पॅनल लुळे पडले आहे अशी टिका सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री कल्याणराव काळे यांनी केले. मौजे पुळूज, ता.पंढरपूर येथे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी आमदार श्री भारतनाना भालके हे होते.
यावेळी बोलतांना श्री काळे म्हणाले की, गेल्या सहा वर्षामध्ये विठ्ठल परिवाराने तालुक्यातील अनेक सहकारी संस्था चांगल्या पध्दतीने चालविल्या आहेत. त्यामुळेच मंगळवेढा आणि मोहोळ तालुक्यातील जनतेने आमदार श्री भारत भालके यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवला आहे. विठ्ठल परिवारातील सर्व नेते आता एकत्रित आल्याने परिवाराची राजकीय ताकद वाढली आहे. यापुढच्या सर्व निवडणुकांमध्ये देखील परिवार एकसंघपणे लढण्यास समर्थ आहे.
गेल्या 3/4 महिन्यापासून तालुक्यातील शेतकरी शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करत असतांना तालुक्यातील शेतकर्‍यांच्या प्रपंचाशी निगडीत असलेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होणे अपेक्षित असतांना काही राजकीय लोकांनी स्वार्थी हेतूने ही निवडणुक सभासदांवर लादण्याचा प्रयत्न केला आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा तालुक्यातील सुमारे 30 हजार सभासदांनी विठ्ठल परिवारातील नेत्यांवर आपला विश्‍वास कायम ठेवला आहे. लोकांचा वाढता पाठिंबा मिळत असल्यानेच विरोधी पॅनल आता लुळे पडल्याचेही श्री काळे यांनी सांगितले.
यावेळी आमदार श्री भारत भालके म्हणाले की, साखर कारखान्याशी काही संबंध नसणारे काही लोक निवडणुकीमध्ये लुडबूड करू लागले आहेत. विनाकारण चूकीचे आरोप करून कारखान्याला बदनाम करण्याचा त्यांचा हा प्रयत्न सभासद येत्या निवडणुकीत मतदानाच्या रूपाने दाखवून देतील. गेल्या 14 वर्षाच्या काळात कारखान्याची प्रगती करीत असतांना सभासद व कामगारांचे हित जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक वेळा सभासदांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी व विवाहासाठी मदत केली आहे. विरोधकांकडे कोणताही मुद्दा नसल्याने ते वैयक्तिक पातळीवर येऊन टिका करू लागले आहेत. त्यांच्या टिकेला आपण निवडणूक निकालानंतर चोख उत्तर देऊ असेही आमदार श्री भारत भालके यांनी स्पष्ट केले.
यावेळी कारखान्याचे संचालक सर्वश्री राजूबापू पाटील, मोहन कोळेकर, बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष नितीन बागल, जिल्हाध्यक्ष माऊली हळणवर, जीवन पाटील, शिवाजी चव्हाण, दिनकर पाटील, धनंजय सालविठ्ठल, रावसाहेब चव्हाण, दत्तात्रय कराळे, भिमा कारखान्याचे उपाध्यक्ष सतीश जगताप आदींची भाषणे झाली.
सभेस माजी संचालक ज्ञानेश्‍वर गायकवाड, धनंजय घाडगे, रामदास चव्हाण, माधव चव्हाण, विक्रम कोळेकर, यांच्यासह पुळूज, ङ्गुलचिंचोली, पोहोरगांव, तुंगत, तारापूर येथील सभासद शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *