विर कर्ण बहुउद्देशीय सामाजिक संघटना, संतपेठ, पंढरपूर यांचे वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी विवेक वर्धिनी प्राथमीक विद्यालयाच्या शिक्षीका सौ. प्रियांका गणेश सिंघण व यांचे शुभहस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी उपस्थित अनेक महिलांनी सावित्रीमाईंचे महिला शिक्षणामधील अनमोल योगदान व त्यांनी संपुर्ण देशातील स्त्रीयांच्या उध्दारासाठी केलेल्या महान कार्याबाबत गौरवास्पद विचार व्यक्त केले. सावित्रीमाईंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत समाजाच्या चौफेर विकासासाठी महिलांनी उच्चशिक्षीत होऊन आपल्या भावी पिढीला सक्षम बनवावे व विविध क्षेत्रात महिलांनी झेप घ्यावी. असे मत यावेळी सौ. प्रियांका सिंघण यांनी व्यक्त केले.
विर कर्ण बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने विविध महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी निमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. तसेच महापुरुषांचे विचार आजच्या तरुण पिढीला कळावेत त्यांच्या विचारांचे आचरण तरुणाईने करावे यासाठी आमच्या संघटनेचा प्रयत्न असतो. असे मत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सचिन गोडसे यांनी व्यक्त केले.
यावेळी सौ.सुमन वाघमोडे, सौ.सरिता फुलारे, सौ.अनिता देवमारे, सौ.लक्ष्मी जाधव, सौ.सुवर्णा काळे आदींसह बहुसंख्यने महिला भगिणी व संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.