महिला अत्याचार व गुन्ह्यास  प्रतिबंधासाठी पोलीस  स्टेशनमध्ये  टॅब मोबाई

Loading

        पंढरपूर-दि.13:-  महिला अत्याचार व त्यासंबधीच्या गुन्ह्यास  प्रतिबंध करण्यास व घडलेल्या गुन्ह्याची तात्काळ दखल घेण्याकरीता सर्व पोलीस ठाण्यास टॅब मोबाईलचे वाटप केले असल्याची माहिती तालुका पोलीस निरिक्षक दयानंद गावडे यांनी दिली.

        सोलापूर ग्रामीणचे जिल्हा पोलीस अधिक्षक विरेश प्रभू यांच्या सुचना व मार्गदर्शनानुसार टॅबचे वाटप होत आहे.  जिल्ह्यातील गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यास प्रतिबंध करण्याकरीता तसेच तात्काळ पोलीसांची मदत पाहिजे असल्यास सोलापूर ग्रामीणमध्ये  ‘KAWACH SOLAPUR RURAL’ नावाचे अॅप्लीकेशन तयार  केलेले आहे. नागरीकांनी आपल्या अँड्रॉॅईड मोबाइलवरुन  PLAY STORE  मधून ‘KAWACH SOLAPUR RURAL’  नावाचे अॅप्लीकेशन डाऊनलोड करुन इन्स्टॉल करुन घ्यावे. कोणत्याही व्यक्तीस संकट काळात मदत हवी असल्यास त्यांनी त्यांच्या मोबाईल मधील ‘KAWACH SOLAPUR RURAL’  या अॅप्लीकेशनमध्ये जावून HELP हे बटन दाबल्यास  जवळच्या पोलीस ठाण्याच्या अधिका-यास संदेश दिला जाईल तसेच त्या व्यक्तीस अधिका-याचा मोबाईल क्रमांक मॅसेजव्दारे कळविला जाईल.

तालुक्यातील गुन्ह्याची तात्काळ दखल घेण्याकरीता पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनकडे  देण्यात आलेल्या टॅब मोबाइलचा WHATSAPP  क्रमांक 7722098159 असून, नागरीकांना कोणत्याही गुन्ह्यासंबधी माहिती मिळाल्यास तात्काळ संबधीत WHATSAPP  मोबाईल क्रमांकावर माहिती द्यावी व त्यासंबधीचे फोटो अथवा व्हिडीओ पाठवावेत, असे आवाहन तालुका पोलीस निरिक्षक दयानंद गावडे यांनी केले आहे. तसेच प्लीकेशन डाऊनलोड करण्यामध्ये काही अडचणी आल्यास 9423884745 व 7722098159 यावर संपर्क साधावा असेही श्री. गावडे यांनी कळविले आहे.

तालुका पोलीस स्टेशनचा WHATSAPP क्रमांक 7722098159

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *