जलयुक्त शिवार अभियानात पंढरपूर तालुक्यातील 15 गावांचा समावेश

पंढरपूर-दि. 14:-  नेहमीच उद्भवणाऱ्या टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी तसेच पावसाचे पाणी शिवारातच अडवून ते जमिनीत मुरविण्यासाठी राज्यात जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात सन 2016-2017 साठी पंढरपूर तालुक्यातील  1गावांचा समावेश करण्यात आला आहे.
          सन 2016-2017 साठी या अभियानात निवडण्यात आलेल्या 1गावांमध्ये भाळवणी, शेंडगेवाडी, धोंडेवाडी, जैनवाडी, वाखरी, गादेगाव, भंडीशेगाव, चिलाईवाडी, पांढरेवाडी, जाधववाडी, शेवते, कोंढारकी, उंबरगाव, अनवली आणि तनाळी या गावांचा समावेश असल्याचे तालुका कृषि अधिकारी पंढरपूर यांनी कळविले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *