महाराष्ट्र राज्य मराठा आरक्षण विद्यार्थी कृती समितीच्या वतीने 15 जानेवारी 2016 रोजी पासुन दिल्ली येथील जंतर-मंतर येथे मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करावी म्हणुन आमरण उपोषण करण्यासाठी काही विद्यार्थी युवक आमरण उपोषणास बसलेले आहेत. तेथील कडाक्याच्या थंडी मुळे उपोषणात बसलेल्या काही विद्यार्थ्यांच्या प्रकृतीत सातत्याने बिघाड होत आहेत. याकडे शासनाचे व प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसुन येते आहे. शासनाचे याकडे लक्ष वेधुन घेण्यासाठी आज पंढरीत छावा च्या वतीने एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
आमरण उपषणास बसलेल्या दिल्ली येथील त्या विद्यार्थ्यांकडे शासनाचे व प्रशासनाचे लक्ष केंद्रीत करण्या साठी व त्या विद्यार्थ्यांना पांठीबां देण्यासाठी पंढरपुर तहसील कचेरीच्या आवारात आज 20 जानेवारी 2016 रोजी एक दिवस लाक्षणीक उपोषण करण्यात आले.
www.pandharpurlive.com
या वेळी सर्व समाज बांधवांनी, संघटनांनी व राजकिय पक्ष या सर्वांनी उपोषण स्थळी येउन अ.भा.छावा संघटन तर्फे उपोषणास बसलेले शहराध्यक्ष सागर कदम, प.म.विध्यार्थी आ. दत्तात्रय काळे,शहर संघटक सागर चव्हाण,जिल्हाध्यक्ष विकी झेंड यांनी पांठीबां दिला.