राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त  पंढरपूर शहरात रॅली संपन्न

पंढरपूर  दि. 25-   राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त प्रशासनाच्या वतीने आयोजीत करण्यात आलेल्या रॅलीचा शुभारंभ तहसिलदार नागेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या रॅलीमध्ये अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, एन.सी.सी. चे विद्यार्थी आणि विवेक वर्धिनी शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्यने सहभागी झाले. या रॅलीत विद्यार्थ्यांनी मतदार राजा जागा हो,  निर्भिडपणे मतदान करा अशा घोषणा दिल्या. या रॅलीची सुरुवात तहसिल कार्यालय येथून होवून  रॅली सावरकर चौक, शिवाजी चौक मार्गे जावून चौफाळा येथे रॅलीचा समारोप झाला.

 00000

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *