संघर्षानंतर जागा मिळालीसंघर्षानंतर जागा मिळाली

20 वर्षांच्या संघर्षानंतर जागा मिळाली : हेमा मालिनी मुंबई : भाजप खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांनी जमीन वादावर मौन सोडलं आहे. “या जागेसाठी मी मागील 20 वर्षांपासून संघर्ष करत आहेत. डान्स स्कूल सुरु करण्यासाठी मला जागा मिळावी आणि तो माझा अधिकार आहे,” असं हेमामालिनी यांनी म्हटलं आहे.
“मला नाट्य विहार केंद्रासाठी जमीन देण्यात आली आहे. यामध्ये कोणतंही राजकारण नाही. मी एक कलाकार आहे. नियमांतर्गतच मला मुंबईत जमीन मिळाली आहे. या नृत्य अकादमीमध्ये सर्वांना मोफत प्रवेश देणार,” असंही हेमा मालिनी यांनी स्पष्ट केलं आहे.
 काय आहे प्रकरण?
अंधेरीतील ओशिवरा परिसरातील 2 हजार स्क्वेअर मीटर जागा राज्य सरकार हेमा मालिनींच्या नाट्य विहार केंद्राला फक्त 70 हजारात देणार आहेआहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी यासंदर्भातली माहिती मागितली होती. त्यानंतर त्यांना ही माहिती मिळाली 
विशेष म्हणजे ही जागा बागेसाठी आरक्षित आहे. आणखी धक्कादायक बाब म्हणजे या जमिनीसाठी 1976च्या दर लावण्यात आला आहे. 35 रुपये प्रती चौरस मीटर एवढा आकारण्यात आला आहे.
 खरंतर भाजपने शिवसेनेवर कुरघोडी करत मुंबईतील रिकाम्या जागा पुन्हा महापालिकेच्या ताब्यात घेतल्या. दुसऱ्या बाजूला मात्र फडणवीस सरकारने हेमा मालिनीवर मेहरबानी दाखवली आहे. त्यामुळे भाजपचा दुटप्पीपणा समोर आला आहे.
 ‘जमीन हातात आल्यावर पैसे देणार’
मथुराच्या खासदार असलेल्या हेमा मालिनी म्हणाल्या की, किती पैसे द्यायचे आहेत हे मला अद्याप माहित नाही. जमिनीचा ताबा मिळाल्यानंतर सरकारच्या नियमांनुसार जेवढे पैसे होतील, तेवढे देणार.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *