Posted inPandharpur
पंढरपूर मध्ये रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या ‘ संस्था बांधणी च नेतृत्व प्रशिक्षण’ च्या वतीने ‘ सी एस आर फंडिंग ‘ या विषयावर कार्यशाळा होणार आहे. रविवार दिनांक ३ जानेवारी रोजी येथील एक्सेल अकॅडेमी मध्ये हे प्रशिक्षण होत आहे. रामभाऊ म्हाळगी प्रबोधनी च्या नेतृत्व प्रशिक्षण व संस्था बांधणी फोरम च्या मानद संचालीका डॉ अरुणा कौलगुड ,तसेच सी एस आर सल्लागार डॉ . सीमा पाटील व त्यांचे सहकारी या प्रशिक्षणात मार्गदर्शन करणार आहेत . सामाजिक , स्वयंसेवी संस्था उभी करत असताना अथवा सामाजिक कार्य करत असताना निधी संकलन करण्याचे विविध मार्ग समजावेत यासाठी हे प्रशिक्षण आहे. शैक्षणिक संस्था अथवा बचत गट यांच्या साठी देखील कशा पध्दतीने निधी संकलन करायचे याचेहि मार्गदर्शन यामध्ये होणार आहे.
Dont Copy