गेल्या 5 वर्षात 40 कोटींचे कर्ज फेडण्यात संचालक मंडळाला यश !- आमदार भारत भालके

  मंगळवेढा दि.02 ः

 पुर्वीच्या संचालक मंडळाने कारखान्यावर कोट्यावधी रूपयांच्या कर्जाचा बोजा करून ठेवला होता. त्यानंतर गेल्या 5 वर्षात सुमारे 40 कोटी रूपये कर्जाची परतङ्गेड करून सभासदांना सलग 5 वर्षे एङ्ग.आर.पी.प्रमाणे ऊस दर दिला आहे. यापुढेही सभासदांना सर्वाधिक ऊस दर देण्याच्या दृष्टीने उपपदार्थ निर्मिती प्रकल्प उभारले जातील अशी माहिती पंढरपूर-मंगळवेढ्याचे आमदार श्री भारत भालके यांनी दिली.
श्रीसंत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने धरमगांव, डिकसळ, येड्राव,खवे, जित्ती, बावची, सलगर बु॥ हुलजंती आदी ठिकाणी झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. सदर सभेच्या अध्यक्षस्थानी मंगळवेढा पंचायत समितीचे मा.उपसभापती श्री संभाजी गांवकरे हे होते.
यावेळी बोलतांना आमदार श्री भालके म्हणाले की, दामाजी कारखान्याच्या माध्यमातून मंगळवेढा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांबरोबरच सर्वसामान्य शेतकर्‍यांनाही त्याचा लाभ मिळाला आहे. दुष्काळी परिस्थितीमध्ये या संचालक मंडळाने पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा, गोर-गरिब शेतकर्‍यांच्या मुला-मुलींसाठी सामुदायिक विवाह सोहळा असे अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. कधीही माळभागचा आणि नदीकाठचा असा भेदभाव न करता सर्वांना कारखान्याचे सभासदत्व देऊन मालकी हक्क दिला आहे. गेल्या 5 वर्षात संचालक मंडळाने सुमारे 40 ते 45 कोटी रूपयांच्या कर्जाची परतफेड केली आहे. हे केवळ आर्थिक नियोजन केल्यामुळे साद्य झाले आहे.
याबरोबरच कामगारांचा थकीत पगार देऊन 6 व्या वेतन आयोगाच्या ङ्गरकाची रक्कमही दिली आहे. राजकीय हेतूने निलंबित केलेल्या कामगारांना परत सेवेत घेऊन त्यांना न्याय देण्याची भूमिका पार पाडली आहे. अतिशय चांगल्या पध्दतीने सुरू असलेल्या या कारखान्यात राजकीय द्वेषापोटी काही मंडळी कारखान्याला व संचालक मंडळाला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. विरोधकांकडे असलेल्या अनेक सोसायट्यांमध्ये लोकशाही जीवंत नसल्याचे दिसून येते. अशा लोकांच्या हाती कारभार देणार की ज्यांनी 5 वर्षात कारखान्याची प्रगती करून सर्वांबरोबर ऊस दर दिला आहे अशा लोकांच्या हातात देणार याचा विचार करण्याची ही निवडणुक आहे.
यावेळी बोलतांना श्री मा.उपसभापती श्री संभाजी गांवकरे म्हणाले आमदार श्री भारतनाना भालके यांचे नेतृत्वाखाली गेल्या 5 वर्षात संचालक मंडळाने सर्वांना विश्‍वासात घेऊन कारखान्याची घडी बसविली आहे. सध्या जे लोक विरोधात गेले आहेत ते केवळ स्वार्थापोटी गेले आहेत. यापूर्वी त्यांना आमदार श्री भारतनाना भालके यांनी अनेक संस्थांमध्ये काम करण्याची संधी दिली. यावेळी नवीन कार्यकर्त्यांना संधी दिल्यामुळे असे या स्वार्थी लोकांचे खरे रूप जनतेसमोर आले आहे. अशा लोकांना मते मागण्याचा नैतिक अधिकार नाही. आमदार श्री भारतनाना भालके यांच्या प्रयत्नाने दुष्काळी भागातील 35 गावांसाठी पिण्याच्या पाण्याच्या योजनेचे काम सुरू आहे. लवकरच या भागातील लोकांना पिण्याचे पाणी मिळणार आहे. शेतीच्या पाण्याच्या प्रश्‍नासाठी ते आज अहोरात्र प्रयत्न करीत आहेत. शासन दरबारी न्याय मिळत नसल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. लवकरच न्यायदेवता तुम्हा-आम्हाला न्याय देईल. यासारखे अनेक प्रश्‍न सोडविण्यासाठी निवडणुकीच्या निमित्ताने आमदार श्री भारतनाना भालके यांचे मागे शेतकर्‍यांनी आपली ताकद उभी करावी असे आवाहनही श्री गांवकरेे यांनी केले.
यावेळी सर्वश्री दौलत माने,येड्रावचे सरपंच गुलाबबाई पाटील, शिवानंद पाटील, प्रा.तुकाराम मोरे यांची भाषणे झाली.
2..

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *