विठ्ठल मंदिरावर आता विद्युत रोषणाई, तर चंद्रभागेच्या वाळवंटात लेझर शो

पंढरपूर : महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या विठ्ठल-रखुमाईचं मंदिर लवकरच आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघणार आहे. मंदिर आकर्षक दिसावं यासाठी ही विद्युत रोषणाई करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. यासाठी दीड कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी आणि मंदिर समितीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी ही माहिती दिली.
सध्या केवळ आषाढी यात्रेच्या काळात मंदिराला अशा पद्धतीची विद्युत रोषणाई केली जात असते. आता मात्र या निर्णयाने कायम स्वरूपी विठूरायाची राऊळी कायमच या दिव्यांच्या झगमगाटात उजळून निघणार आहे. हे रोषणाईचे काम पुढील 2 महिन्यात पूर्ण करण्याची तयारी मंदिर समितीने केली असून याला दीड कोटी रुपये खर्च केला जाणार आहे.
याचबरोबर चंद्रभागेच्या वाळवंटात मंदिर समिती अर्धा लेझर शो सुरु करणार असून यातून पंढरपूर आणि विठ्ठल मंदिराचा इतिहास सांगितला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी सांगितले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *