नवी दिल्ली: नेपाळ, तैवान आणि भारतातील बिहारच्या सीमाभागाला काल भूकंपाचे धक्के जाणवले.
तैवानमध्ये 6.4 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. या भूकंपामध्ये एक रहिवासी इमारत कोसळली.यात तिघांचा मृत्यू झाला आहे. तर 154 जण जखमी आहेत.
या इमारतीतून जवळपास 120 नागरिकांना बाहेर काढण्यात यश आलं. आणखी काही जण अडकल्याची भीती आहे. भूकंपामुळं बऱ्याच इमारतीचं मोठं नुकसान झालं आहे.
नेपाळमध्येही हादरे
नेपाळमध्ये पुन्हा एकदा भूकंप झाला. भूकंपाची तीव्रता 5.2 रिश्टर स्केल इतकी होती. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र 15 जण यात जखमी झाले आहेत. नेपाळची राजधानी काठमांडूपासून 16 किलोमीटर अंतरावर भूकंपाचं केंद्र होतं.
भूकंपाच्या धक्यांमुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं, त्यामुळं लोकं घराबाहेर आले.

