हिट अँड रन : पीडित कुटुंबाची सुप्रीम कोर्टात धाव

नवी दिल्ली : 2002 सालच्या हिट अँड रन प्रकरणी अभिनेता सलमान खानच्या अडचणी पुन्हा एकदा वाढल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने सलमानची निर्दोष मुक्तता केल्यानंतर, या दुर्घटनेतील पीडित नुरुल्ला शेखच्या कुटुंबियांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
शेख कुटुंबियांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून 12 फेब्रुवारी रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. 2002 सालच्या हिट अँड रन प्रकरणी अभिनेता सलमान खानच्या अडचणी पुन्हा एकदा वाढल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने सलमानची निर्दोष मुक्तता केल्यानंतर, या दुर्घटनेतील पीडित नुरुल्ला शेखच्या कुटुंबियांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
शेख कुटुंबियांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून 12 फेब्रुवारी रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.तस
हिट अँड रन प्रकरणी सलमानची मुंबई उच्च न्यायालयाने 10 डिसेंबरला निर्दोष मुक्तता केली होती. सलमानवरील दोष सिद्ध करण्यास सरकारी पक्ष अपयशी ठरल्याचं मत यावेळी न्यायालयाने नोंदवलं होतं. याशिवाय पोलिस कॉन्स्टेबल रवींद्र पाटील यांची साक्ष ग्राह्य धरण्यास न्यायालयाने नकार दिला होता.
दुसरीकडे राज्य सरकारने याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र त्याआधीच नुरुल्ला शेखच्या कुटुंबानेच सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *