सामाजिक , शैक्षणिक संस्था व बचत गटासाठी पंढरपुरात निधी संकलन प्रशिक्षण

पंढरपूर : 
सामाजिक , शैक्षणिक संस्था अथवा बचत गटासाठी निधी संकलनाचे मार्ग या विषयावर पंढरपुरात एक दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे .  रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या नेतृत्व प्रशिक्षण आणि संस्था बांधणी केंद्राच्या वतीने दिनांक १४ फेब्रुवारी रोजी एक्सेल च्या बँक ऑफ बडोदा , दुसरा मजला , स्टेशन रोड या सेंटर मध्ये हे प्रशिक्षण होणार आहे यासाठी पूर्वनावनोंदणी आवश्यक आहे . 
या प्रशिक्षणामध्ये स्वयंसेवी संस्थांना निधी जमा करण्यासाठी  मार्गदर्शन केले जाणार आहे . अनेक स्वयंसेवी ,सामाजिक तसेच शैक्षणिक संस्थांना समाज उपयोगी कार्यासाठी निधींची गरज असते मात्र स्थानिक पातळीवर अशा सार्वजनिक कामासाठी पुरेसा निधी उपलब्ध नसतो . मोठ्या उद्योग समूहांकडे  असणारा कॉर्पोरेट फंड  सामाजिक संस्था अथवा व्यक्तींसाठी राखीव ठेवलेला असतो मात्र अशा निधी साठी  प्रस्ताव कसा पाठवायचा , कोठे पाठवायचा  माहिती ग्रामीण संस्थांना नसते म्हणून रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या वतीने हे प्रशिक्षण  घेतले जाते. 
या प्रशिक्षणासाठी पणे येथून डॉ अरुणा कौलगुड यांच्यासह सी एस आर क्षेत्रात काम करणारे सल्लागार प्रशिक्षण म्हणून येतात .  प्रकल्प उभारणी, निधी साठी , सादरीकरण निधी देणाऱ्या कंपन्या आदी बाबत या मध्ये महत्वपूर्ण माहिती मिळते . 
सकाळी ११ ते सायंकाळी ६ पर्यत हे प्रशिक्षण होते . यापूर्वी हि प्रशिक्षणे केवळ पुणे आणि मुंबई येथे होत होते  मात्र ग्रामीण भागातील संस्थाना  याचा लाभ मिळावा  यासाठी पंढरपूर येथे हे प्रशिक्षण घेण्यात आले आहे . या बाबत अधिक माहिती साठी ७२१९४६०२६१  या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या साठी ऑन लाईन प्रवेशसाठी संकेत स्थळाला भेट द्यावी www.excel.abgroupindia.in

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *