👁 6 Views

मध्यरात्री भाजी मंडईला मोठी आग, भाजी विक्रेत्याचे ९० स्टॉल जळून खाक

 

हडपसर: हांडेवाडी रस्ता, चिंतामणी नगर येथे असणारया भाजी मंडईमध्ये आग लागल्याची घटना घडली.


आगीची वर्दि अग्निशमन दलाकडे येताच काळेबोराटे नगर अग्निशमन केंद्र, हडपसर व कोंढवा बुद्रुक येथून एकुण तीन अग्निशमन वाहने रवाना करण्यात आली होती.


घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाहिले असता, भाजी मंडईमध्ये मोठ्या प्रमाणात आग लागल्याचे निदर्शनास आले. जवानांनी तातडीने चारही बाजूने पाण्याचा मारा सुरू केला व त्याठिकाणी कोणी नागरिक नसल्याची खाञी केली. जवानांनी २५ मिनिटात आग पुर्ण आटोक्यात आणत कुलिंग करुन आग पुर्ण विझवत धोका दूर केला.


त्याठिकाणी छोटे भाजी विक्रीकरिता असणारे अंदाजे ९० स्टॉल असून जवळपास सर्व स्टॉलचे आणि त्यामध्ये असणारया भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून तिथे असणारे दोन टेम्पो ही जळाले आहेत. आगीचे कारण समजू शकले नाही. या कामगिरीत अग्निशमन अधिकारी प्रमोद सोनावणे तसेच तांडेल विलास दडस व जवान अनिमिष कोंडगेकर, चंद्रकांत नवले, बाबा चव्हाण, दशरथ माळवदकर, विशाल यादव, प्रकाश शेलार यांनी सहभाग घेतला.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *