![]()
पंढरपूर, प्रतिनिधी आजच्या काळात महिलांवरील अन्याय अत्याचारात वाढ होत चालली आहे. महिलांनी केवळ चुल व मुल यामध्ये गुरङ्गटून न राहता आपल्यावर होत असलेल्या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी
एकत्र येवून स्त्री शक्तीची एकजुट दाखवावी, असे प्रतिपादन पोलिस उपनिरिक्षक (सोलापूर) रिया बोधे यांनी
केले. श्री संत नामदेव शिंपी समाजाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांच्या पारितोषिक वितरण व तिळगुळ वाटप कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी (वर्ग 1) रामेश्वरी बोंगाळे, प्रा.श्रीमती बोधे मॅडम, ह.भ.प. कृष्णदास महाराज नामदास, पत्रकार दिपक होमकर प्रमुख उपस्थित होते. पुढे बोलताना बोधे मॅडम म्हणाल्या, आज विविध क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहेत. ही अभिमानाची बाब आहे. महिलांनी अन्यायाला बळी न पडता स्वतःचे संरक्षण करण्याला प्राधान्य द्यावे. राणी लक्ष्मीबाई, अहिल्यादेवी होळकर, राष्ट्रमाता जिजाऊ, सावित्रीबाई ङ्गुले तसेच अंतराळवीर कल्पना चावला यांच्या कार्याचा इतिहास डोळ्यासमोर ठेवून विविध क्षेत्रात कार्य करण्याचे आवाहन केले. रामेश्वरी बोंगाळे म्हणाल्या, आजच्या स्पर्धात्मक युगात महिलांनी, तरुणींनी न डगमगता एकत्र येवून अन्यायाचा प्रतिकार केला पाहिजे. विविध स्पर्धांमध्ये मुली या मुलांपेक्षा जास्त गुण मिळवत आहेत. आजच्या पुरुषप्रधान संस्कृतीत महिलांना दुय्यम स्थान दिले जाते. अत्याचाररुपी महिषासुराचा नायनाट करण्यासाठी महिलांनी एकत्र यावे. तसेच आजच्या तरुणींनी विविध स्पर्धा परिक्षांमध्ये सहभागी होवून उज्वल यश संपादन करावे. यासाठी महिला व तरुणींना योग्यप्रकारचे मार्गदर्शन करण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. विविध स्पर्धांच्या अंतर्गत मेहंदी, 1 मिनिटांच्या विविध स्पर्धा तसेच सौभाग्य अलंकार व ओटिचे साहित्य वापरून रांगोळी तयार करणे या अनोख्या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांना समाजातील महिला व तरुणींचा उत्स्ङ्गुर्त प्रतिसाद मिळाला. रांगोळी स्पर्धेत अमृता बंगाळे तर मेहंदी स्पर्धेत शर्वरी मुळे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. मान्यवरांच्या हस्ते स्पर्धकांना पारितोषिके देण्यात आली. त्यानंतर महिलांना हळदी-कुंकू व वाण आणि पुरुषांना तिळगुळ वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष गणेश उंडाळे, उपाध्यक्ष संजय जवंजाळ, सचिव विलास पोेरे, खजिनदार शशीकांत जवंजाळ, विश्वस्त भागवत म्हैंदरकर, अनिल निकते, राजेश धोकटे, महेश गानमोटे, संजय चांडोले, अनंता पतंगे (म्हेत्रे), महिला मंडळाच्या सौ

. कलावती शेंडगे, सुनिता जवंजाळ, तृप्ती गानमोटे, आशा धोकटे, गिता पोरे यांनी परिश्रम घेतले. यावेळी समाज बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.