पुणे : व्हॅलेंटाईन डेला पुण्यामध्ये गालबोट लागलं आहे. हडपसरमध्ये व्हॅलेंटाईन डेच्या पार्टीमध्येच तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
व्हॅलेंटाईन डेच्या पार्टी निमित्त पीडिता मित्रासोबत गेली होती. त्यावेळी मित्रासोबत आलेल्या तरुणाने बलात्कार केल्याचा आरोप आहे. हडपसर पोलिसांनी आरोपी फिरोज शेखला अटक केली आहे.