नाशकात दोन सेल्फीबळी…

Loading

नाशिक : नाशिकमध्ये वालदेवी धरणावर फिरण्यासाठी गेलेल्या दोघा विद्यार्थ्यांचा सेल्फी काढण्याच्या नादात पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. शनिवारी दुपारी ही घटना घडल्याचं वृत्त आहे.

         अजिंक्य गायकर आणि सौरभ चुळभरे अशी बुडून मरण पावलेल्या युवकांची नावं आहेत. याप्रकरणी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
           सिडकोतील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या स्वर्गीय शांतारामबापू वावरे महाविद्यालयात शनिवारी बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ होता. या कार्यक्रमानंतर अजिंक्य आणि सौरभ हे आपल्या दहा मित्रांसमवेत वालदेवी धरण परिसरात फिरण्यासाठी गेले होते.

           वालदेवी धरणाच्या प्रवेशद्वाराजवळच दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास सौरभ हा धरणाजवळ एका दगडावर उभा राहून सेल्फी काढत असताना तोल जाऊन पाण्यात पडला. यावेळी सौरभला वाचवण्यासाठी  अजिंक्यने उडी घेतली. मात्र, हे दोघेही पाण्यात बुडाल्यानं त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *