मुंबई: मुंबईमध्ये सध्या मेक इन इंडिया वीक सुरु आहे. याचाच भाग असलेल्या महाराष्ट्र रजनी कार्यक्रमासाठी बांधण्यात आलेल्या स्टेजला आग लागली आहे. गिरगाव चौपाटीवर महाराष्ट्र रजनी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्य़क्रम सुरु असतानाच ही आग लागली, सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.