पृथ्वीराज चव्हाण यांचे हस्ते वनपरिक्षेत्र आधिकारी राजेश नवनाथ पवार यांचा सत्कार

पंढरपूर ता.(15) – सन 2015 मध्ये महाराष्ट्र राज्य लोकसेवा अयोगामार्ङ्गत घेण्यात आलेल्या परिक्षेत वनपरिक्षेत्र आधिकारी या पदासाठी निवड झालेले राजेश नवनाथ पवार यांचा सत्कार राज्याचे माजी मु‘यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे हस्ते करण्यात आला या प्रसंगी वनमंत्री पतंगराव कदम, सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे,जेष्ठ साहित्यिक द.ता.भोसले, विठठलचे व्हा.चेअरमन लक्ष्मण आबा पवार, संचालक  युवराज पाटील, राजु बापू पाटील,यशवंतराव चव्हाण पतसंस्थेचे चेअरमन नारायण मोरे, प्रतिभादेवी पतसंस्थेचे चेअरमन महादेव देठे आदी मान्यवर उपस्थित होते.
  सहकार शिरोमणी वसंतदादा काळे यांच्या 72 व्या जयंती वसंतदादा प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणार्‍या पुरस्कार वितरण समारंभ प्रसंगी पवार यांचा सत्कार करण्यात आला. राजेश पवार हे पंढरपूर तालुक्यातील खेडभोसे येथील शेतकरी कुटूंबातील असून त्यांचे 12 वी पर्यंतचे शिक्षण यशवंत विद्यालय व ज्युनियर कॉलेज भोसे येथे झालेले आहे. त्यानंतर पदवीधर शिक्षण परभणी कृषि विद्यापीठ येथे घेतले आहे. सध्या ते आंद्रा बँक हैद्राबाद या ठिकाणी कृषि आधिकारी म्हणून काम पाहत आहे.
  यावेळी काळे म्हणाले की, गोरगरीब शेतकर्‍यांची मुले शिक्षणात हुशार आहेत पण त्यांना वेळोवेळी प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळणे गरजेचे असून म्हणूनच हा यथोचित गौरव करण्यात आल्याचे सांगीतले

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *