![]()
भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी पंढरपूर येथील सामाजिक कार्यकर्ते संजय बंदपट्टे यांची निवड झाली असुन या निवडीचे त्यांना सोलापूर येथे झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रिय अध्यक्ष प्रदिप पाटील खंडापूरकर यांनी प्रदान केले.यावेळी प्रदेशाध्यक्ष विलासराव शेंडगे,प.महाराष्ट्र अध्यक्ष धनंजय सुतार,दत्ता भोसले,प्रदिप थोरात,तालुकाध्यक्ष धनंजय पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना राष्ट्रिय अध्यक्ष प्रदिप पाटील म्हणाले की,आज आपला देश महासत्तेकडे वाटचाल करीत आहे परंतू या देशात शासकिय यंत्रणा व लोकसेवकांमध्ये बोकाळलेला भ्रष्टाचार हा देशाच्या प्रगतीतील फार मोठा अडथळा असुन त्याच बरोबर सर्वसामान्य कष्टकरी जनतेचे हक्क भ्रष्टाचारी लोक नाकारताना दिसून येतात त्यामुळेच अ.भा.भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीच्या माध्यमातुन आम्ही संघर्ष करीत आहोत.
यावेळी बोलताना नुतन जिल्हाध्यक्ष संजय बंदपट्टे म्हणाले की,कष्टकरी जनतेच्या हालअपेष्टास जशी बेरोजगारी कारणीभूत आहेत तसाच भ्रष्टाच ारही कारणीभूत आहे.भ्रष्टाचाराचे चटके काय असतात हे दिवसाकाठी शंभर रुपये कमविणार्या माणासाला जेव्हा हजार रुपायची लाच मागीतली जाते तेव्हा अनुभवास येते.घरच्या लक्ष्मीची गळ्यातील मणीमंगसुत्र गहान टाकुन लाच देण्याची पाळी अनेक गरीबांवर आलेली दिसून येते हे आपण डोळ्याने पाहीले आहे.म्हणूनच भ्रष्टाचाराच्या विरोधातील हा लढा आपण लढावयाचे ठरवले आहे असे ते म्हणाले.
यावेळी सोमनाथ देवकर, आंबादास आगलावे,अजय बंदपट्टे, महेश धोत्रे,नागेश कुंभार ,तुळजाराम बंदपट्टे,अमोल बंदपट्टेे,तुषार खेडकर,गिरीष हिरणवाळे,बालाजी बंदपट्टे,दिनेश बंदपट्टे,धनाजी पवार,नितिन धोत्रे आदी उपस्थित होते.

