शाळेत विद्यार्थ्यांनी शिक्षकांदेखत तलवारीने केक कापला

नागपूर : ज्या वयात हाती पुस्तक आणि लेखणी असावी, त्या वयात शाळेतील मुलांनी हाती तलवार घेतली आणि चक्क त्या तलवारीने केक कापला. नागपूर महापालिकेच्या कपिलनगर हिंदी शाळेत हा प्रकार घडला आहे.
हा प्रकार घडत असताना शाळेतलेच 300 विद्यार्थी आणि खुद्द मास्तरही उपस्थित होते. गदारोळ झाल्याने शिक्षकांनी या प्रकारावर दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र पोलिस याप्रकरणी कारवाई करणार आहेत.
27 जानेवारीला कपिलनगर हिंदी शाळेत सुफी संत ताजुद्दीन बाबा यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम झाला. या निमित्त आणलेला केक कापण्यासाठी एका विद्यार्थ्याने तलावर हातात घेतली. त्यानंतर त्याच तलवारीने इतर विद्यार्थ्यांनीही केक कापले.
हा व्हिडीओ हाती लागल्यानंतर एखाद्या शाळेत तलवार पोहोचतेच कशी? असा प्रश्न ‘माझा’ने विचारला. त्यावर शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी घडलेल्या प्रकारावर माफी मागितली आहे.
शाळेत तलवारीने केक कापून चूक केली, असं विद्यार्थी सांगतात. पण बाहेर काही गुन्हेगारांना तलवारीने केक कापताना पाहिले होते. त्याचंच अनुकरण केल्याचं विद्यार्थी म्हणाले.
दरम्यान, शाळेत तलवार निघणं आणि विद्यार्थ्यांनी हातात तलवार घेऊन त्याचं प्रदर्शन करणं अत्यंत गंभीर बाब असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. शाळेत तर असे प्रकार मुळीच होता कामा नये, असं सांगत पोलिसांनी कायदेशीर कारवाई सुरु केली आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *