आरोग्य संवाद -वजन घटवा योग्य रीतीने

Loading

                     

आज वाढलेले वजन कमी करण्यासाठी अक्षरशः स्पर्धा लागलेली आहे.जो तो डायट च्या नावाखाली उपासमार करत सुटलेला आहे.काही जण तर वजन घटवण्यासाठी औषधे घेऊ लागले आहेत तर बरेच जण जीव तोडून व्यायाम करू लागले आहेत.हे सर्व कशासाठी तर फक्त वजन घटवण्यासाठी.पूर्वी जिम्समधून कोणी फिरकत नसे, मात्र आता जवळजवळ सर्वच जिम्स गच्च भरलेल्या दिसतात.( यामुळे आम्हा व्यायाम शिक्षकांना मात्र चांगले दिवस आले आहेत.लोकांचे वजन कमी होवो वा न होवो आमचा इनकम मात्र वाढत चालला आहे )जेवण प्रमाणापेक्षा कमी, अती व्यायाम, व सदोष व्यायाम यामुळे वजन किती कमी होते माहित नाही पण अशक्तपणा येऊन आजारपण नक्की येते.
                    खरं तर वजन घटवण्यासाठी फार कष्टाचे व्यायाम करण्याची काहीच गरज नसते. कारण यामुळे शरीराची मोठ्या प्रमाणात मोडतोड होते. पूर्ण विश्रांती मिळाली नाही तर शरीराचे झालेले नुकसान भरून निघत नाही.यामुळे दिवसभर थकवा वाटत राहतो, व पुढे याचे रूपांतर  प्रथम कमजोरी आणि नंतर आजारपणात होते. वजन घटवण्यासाठी कमीत कमी जेवण म्हणजे जास्तीत जास्त वेळ उपाशी राहणे हे तर प्रचंड घातक ठरते.शरीराला आवश्यक न्यूट्रँट्स,व्हिटॅमिन्स व मिनरल न मिळाल्यामुळे शरीर रोगी होऊ लागते.सांधेदुखी सुरु होते, बॉडी असिडीटीक होऊन बसते.कुठलेच काम करण्याचा उत्साह राहत नाही.नुसते पडून राहवेशे वाटते. ताकतीने अथवा गडबडीची कामे करण्यात असफलता येऊ लागते.डॉक्टरांना भेटण्याची व औषधोपचार घेण्याची वेळ येऊन बसते.या सर्वांमुळे वजन आवश्य कमी होते पण असले वजन कमी करणे कधीही धोक्याचेच ठरते.
                  आतून जरी आपण कमजोरी अनुभवत असलो तरी आपण समोरच्याला कधीच ते जाणवू देत नाही. मात्र समोर कोणीही आले कि लगेच विचारणं होते ‘ काय हो बरे नाही वाटत का तुम्हाला’ ?. आपण उत्तर देतो ‘नाही अगदी ठणठणीत आहे. वजन कमी केले आहे म्हणून तुम्हाला असे वाटत असेल.उलट मला तर आता खूप उत्साही असल्यासारखे वाटत आहे.बरं झालं एकदाचं वजन कमी झाले ते.’
                मित्रांनो आणि माताभगिनींनो हे वरवरचे बोलणे आपण सर्वानीच कधी न कधी ऐकलेले आहे.याला म्हणतात फक्त दिखाव्यासाठी वजन घटवने.हे फक्त आणि फक्त घातक असते.समजदार व्यक्ती कधीच हे शॉटकत घेत नाही.आणि जे घेतात ते

कायमचे जाड़जुडच राहतात कारण थोड्याच दिवसात कमजोरी आल्यामुळे पुन्हा लवकरच स्वविवेकबुद्धीने सुरु केलेले डायट बंद करून नॉर्मल जेवण सुरु करावे लागतेआणि वजन पूर्ववत होऊन बसते.अशा प्रवृत्तीच्या लोकांना
वजन घटवण्यात कधीच यश येत नाहि.आयुष्यभर हे लोक गुटगुटीतच राहतात.
आपल्याकडे एखादी व्यक्ती जरा जाड आहे हे कबूल करणारेच फार कमी आहेत.’तो किंवा ती आधीपासूनच आडव्या हाडाचा आहे.(आडव्या बांध्याचा ) असे म्हणत जाडपणाला नजरअंदाज केले जाते. एकदा का लग्नवगैरे जुळवायची वेळ आली कि मग वजनाची जाणीव करून द्यायची.गरज लागत नाही तोपर्यंत म्हणजे १०-१५ वर्ष गप्प पणे वाजून वाढू द्यायचे आणि कमी करावेसे वाटले कि मात्र “एका महिन्यात जास्तीत जास्त किती किलो वजन कमी कराल”? 
                 असा प्रश्न विचारातच जिमला प्रवेश घ्यायचा.म्हणजे वाढवायला १०-१५ वर्ष आणि घटवायला फक्त एखाद दुसरा महिना.त्यात पण म्हणावा तसा फरक पडला नाही तर जिमच बंद.घरच्याचा प्रश्न “कशाला फुकट चे पैसे भरायचे”? हा सगळा गोंधळ आहे वजन घटवण्याचा.तर पुढच्या लेखात पाहू या लेखाच्या पुढचा भाग.शंकानिरसन आणि शिबारा साठी नक्की संपर्क करा.

कानिरसन आणि शिबिरासाठी संपर्क करा.   दत्ता गायकवाड -९६१९३२४०८०.आवश्य भेट द्या, 

www.dattagaikwad.com


महाराष्ट्रातील लोकप्रिय आरोग्य विषयक सल्लागार श्री दत्ता गायकवाड यांचे अभ्यासपुर्ण आरोग्यविषयक लेख दररोज… वाचा फक्त आपल्या पंढरपूर लाईव्ह आणि महाराष्ट्र लाईव्ह न्युज वर…

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *