चैत्री एकादशी निमित्त जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची नित्यपुजा संपन्न
पंढरपूर, दि. 17 :- चैत्रीवारी एकादशी निमित्त जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्या हस्ते सपत्निक श्री विठ्ठल-रुक्मिणीची नित्यपुजा संपन्न झाली. जिल्हाधिकारी यांच्या समवेत नित्यपुजेस उपस्थित राहण्याचा मान दर्शन रांगेतील करवीर तालुक्यातील (जि. कोल्हापूर) नंदगाव येथील श्री. तायाप्पा सुबराव कांबळे व सौ. आक्काताई तायाप्पा कांबळे या दाम्पत्याला मिळाला.
यावेळी प्रांताधिकारी संजय तेली, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी शिवाजी कादबाने, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश जाधव, तहसिलदार नागेश पाटील, शहर पोलीस निरीक्षक किशोर नावंदे, मंदिर समितीचे व्यवस्थापक विलास महाजन यांच्यासह मान्यवर पदाधिकारी व मंदिर समितीचे कर्मचारी उपस्थित होते.
Photo
Umesh Tomke
000000
