👁 5 Views

साडेपाच लाखांची रोकड कसबा मतदारसंघातून जप्त

 

पुणे – पोटनिवडणुकीमध्ये पैशांचा वापर रोखण्यासाठी कसब्यात भरारी पथकाकडून वाहनांच्या तपासणीला वेग आला आहे. कसब्यात मंगळवारी साडेपाच लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.


चिंचवडमध्ये आतापर्यंत 43 लाख रुपये, तर कसब्यात यापूर्वी 5 लाख 3 हजार, तर मंगळवारी साडेपाच लाख रुपये अशी कसब्यात एकूण 10 लाख 53 हजार 500 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.


रोकड स्वारगेट येथे भरारी पथकाने चारचाकीची तपासणी करून जप्त केली. संबंधिताकडे चौकशी करण्यात आली. मात्र, हे पैसे कोठून आणले याबाबत त्याची उत्तरे संशयास्पद आढळल्याने पोलिसांनी रोकड जप्त केली. 


त्या व्यक्‍तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, कसब्यात भरारी आणि अवैध रोकड तपासणारी प्रत्येकी नऊ पथके, चित्रीकरण- दोन, आणि आर्थिक हिशेब पाहण्यासाठी प्रत्येकी एक पथक कार्यान्वित आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *