👁 5 Views

पुणे: अल्पवयीन मुलीच्या घरात मध्यरात्री तीन वाजता घुसून गैरवर्तन

 आळेफाटा :  एका तरुणाने बारावीत शिकणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या घरात मध्यरात्री तीनच्या सुमारास घुसून ‘तू माझ्याशी का बोलत नाही’ असे म्हणत तिच्याशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला.


घटना गुरुवारी (दि २२) जुन्नर तालुक्यात घडली. सिद्धेश चंद्रकांत शिंदे ( वय-२३ रा. राजुरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत १७ वर्षीय तरुणीने आळेफाटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.


याबाबत आळेफाटा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गुरुवार (दि २२) रात्री तीनच्या सुमारास अल्पवयीन मुलगी राहत असलेल्या घराचा दरवाजा वाजवून ओळखीच्या सिद्धेश शिंदे याने घरात प्रवेश केला. यावेळी सिद्धेश अल्पवयीन मुलीला म्हणाला की, ‘तू माझ्याबरोबर का बोलत नाहीस, तुला माझ्याबरोबर बोलायचे नाही का, असे म्हणून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. यावेळी मुलीची आई भांडण सोडवायला गेली असता आरोपी सिद्धेश शिंदे याने तिलाही मारहाण केली.


त्यानंतर मुलीला कॉलेजला जाताना मारून टाकतो अशी धमकी दिली. याप्रकणी मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून आळेफाटा पोलिसांनी आरोपी सिद्धेश शिंदे विरोधात विनयभंगासह बाल लैंगिक अत्याचार संरक्षण (पॉस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *