वाखरीजवळ अपघातात शिक्षीकेचा मृत्यु

पंढरपूर (प्रतिनिधी):-पंढरपूर तालुक्यातील वाखरी जवळ झालेल्या अपघातामध्ये वाडीकुरोली येथील शाळेत निघालेल्या शिक्षीकेचा अपघातात मृत्यु झाल्याची दु:खद घटना आज घडली. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्यास निघालेल्या शिक्षीकेवर काळाने असा अकस्मात घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत पंढरपूर तालुका पोलिसांकडून समजलेल्या  वृत्तानुसार आज दि. 15/6/2016 रोजी सकाळी 9:30 वाजणेच्या सुमारास वाखरी जवळील गोसावी यांचे इंडीयन ऑईल पेट्रोल पंपासमोर पंढरपूर-वेळापूर रोड वरुन वाडीकुरोली येथील वसंतराव काळे प्रशालेवर शिक्षक असलेले बाळासाहेब सोपान पवार (46) व वर्षा मच्छिंद्र दळवी-पवार (42) रा. पुजारी सिटी, रुम 202, इसबावी, पंढरपूर हे दोघे शिक्षक पती-पत्नी पॅशियन मोटारसायकल (एम.एच.13, ए.टी.8909) वरुन शाळेकडे जात असताना वेळापूरकडून पंढरपूरकडे येत असलेल्या बोलेरो (एम.एच. 13 ए.झेड. 7781) या गाडीने समोरुन जोराची धडक दिल्याने   अपघातामध्ये वाडीकुरोली येथील शाळेत शिक्षीका असणार्‍या वर्षा मच्छिंद्र दळवी-पवार यांचा जागीच मृत्यु झाला तर बाळासाहेब पवार हे जखमी झाले आहेत.

बोलेरो (एम.एच. 13 ए.झेड. 7781) या गाडीचा चालक सिताराम हरिदास भुईटे, रा.पळशी, ता.पंढरपूर याने त्याच्या ताब्यातील वरील गाडी भरधाव वेगाने, हयगईने व अविचाराने, निष्काळजीपणे चालवुन मोटारसायकलला जोराची धडक देऊन मोटारसायकलवरील बाळासाहेब पवार यांना गंभीर जखमी करुन  वर्षा दळवी यांच्या मृत्युस कारणीभुत होऊन दोन्ही वाहनांचे सुमारे 40 हजार रुपयाचे नुकसानीस बोलेरो गाडीचा चालक सिताराम हरिदास भुईटे हा कारणीभुत ठरला आहे.

याबाबतची ङ्गिर्याद पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात दिपक हणुमंत राऊत रा.संतपेठ पंढरपूर यांनी दिली आहे. अधिक तपास हेड कॉन्स्टेबल ढवळे हे करीत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *