“फोरम ऑफ इंटेलेक्चुअल्स” ही संस्था बरयाच वर्षापासून शेतकऱ्यांचे प्रश्न व ग्रामीण आर्थिक विकास ह्या बाबत कार्यरत आहे.
Forum Of Intellectuals: Working for the benefits of,
आम्ही शेतकऱ्यांसाठी “कृषिक्रांती ग्रंथालय (मोफत)” हा अभिनव उपक्रम सुरु करावयाचे ठरविले आहे. अश्या प्रकारचे वाचनालय, पूर्णपणे कृषी क्षेत्राला वाहिलेले, हे कदाचित महाराष्ट्रात पहिलेच असेल.
ह्याद्वारे ग्रामीण भागातील लोकांना खालील प्रकारची माहिती विना शुल्क मिळेल.
उद्देश:
* शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे.
* शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या चळवळीतील माहिती व्हावी.
* कृषि विज्ञान केंद्र व कृषि विध्यापीठातील संशोधनाबद्दल अद्यावत माहिती मिळणे.
* चळवळीतील कार्यकर्त्यांना, अभ्यासकांना विविध रिपोर्टस, अहवाल व आयोगाचे तपशील
* शेतकऱ्यांसाठीच्या शासनाच्या अर्थ सह्हायाच्या, कर्ज व अनुदान योजना
* शेतीविषयक कायदे
* विविध विचारवंताची गाजलेली पुस्तके (उदाः शेतकऱ्याचा आसूड)
* शेतकरी संघटनेची कार्य व विचारप्रणालीची पुस्तके
* सहकार चळवळ माहिती
* आदर्श गाव संकल्पना
* हवामान अंदाज, शेती क्षेत्राशी संबधीत चालू घडामोडी, बाजारभाव मालाची ताजी माहिती इत्यादि
* विविध पिकांसाठी संबधीत तज्ञांचे संपर्क पत्ते, फोन नं.
* कृषी मासिके विशेषांक – उदा फुलशेती, डाळीब, सेंद्रिय शेती, पशुपालन व दुग्ध व्यवसाय वगॆरे
* पर्यावरण विषयक माहिती
* फळ व अन्न प्रक्रिया उद्योग, पणन व निर्यात व्यवस्थापन
ह्या वाचनालयासाठी आपल्या प्रकाशनाची / संग्रहातील कृषि व ग्र्राम विकास संदर्भातील महत्वाची पुस्तके, माहिती, विशेषांक, दैनिक, साप्ताहिक वगॆरे आपण आम्हास विनामुल्य सप्रेम भेट द्यावी व ह्या सामाजिक उपक्रमास हातभार लावावा हि विनंती.
पुण्यातील आमचा प्रतिनिधी आपणास संपर्क करेल. पुण्याबाहेरील प्रकाशकांनी कृपया आपली पुस्तके कुरियरने किंवा तुमच्या वितरका मार्फत द्यावीत. आम्ही आपले अत्यंत आभारी राहू.
“ग्रंथ दान हेच श्रेष्ट दान”
धन्यवाद !
Regards
Satish K. Deshmukh, BE (Mech.)
President: Forum Of Intellectuals
G-65, Aditya Nagar, Gadital,
Hadapsar, Pune-411028.
Maharashtra State, India
Contact Details:
a) E-mail: deshmukhsk29@gmail.com
b) Cell No.: +91 9881495518
c) Blogger: deshmukhsk29. blogspot.com
d) Face Book: www.facebook.com/satish. deshmukh.184
………………………… ………………………… ………………………… …………………..
* Farmers & Rural Development
* Society, Nation, Environment & Mankind
